Ghataprabha

दहावीची परीक्षा दिलेल्या 32 जणांना कोरोना

सात लाख 61 हजार 506 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

प्रगती वाहिनी न्यूज बेंगलोर: कोरोनाच्या भीतीदायक वातावरणातच परीक्षा दिलेल्या सात लाख 61 हजार 506विद्यार्थ्यांपैकी 32 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचे उघड झाले आहे.
राज्यभरात जून 25 तारखेपासून जुलैच्या तारखेपर्यंत परीक्षा झाल्या होत्या करण्याची प्रकरणे वाढत असतानाही राज्य सरकारने परीक्षा घेतल्या होत्या यासंदर्भात पालकांकडून विरोधी व्यक्त करण्यात आला होता पण राज्य सरकारने दहावीची परीक्षा चांगल्या पद्धतीने हाताळली असून हवी ती सर्व उपाययोजना त्यांनी केली होती, त्यामुळे फक्त 32 विद्यार्थी कोरोना पीडित झाल्याचे समजते यामुळे राज्य सरकारचे काम चांगली होत असल्याचे बोलले जात आहे.
या 32 विद्यार्थ्यांच्या प्राथमिक संपर्कात आलेल्या ऐंशी विद्यार्थ्यांनाही होम कोरांटेन करण्यात आले आहे.