Beereshwara add 5
Crease wise add 8
KLE1099 Add

सहा सप्टेंबर पासून प्राथमिक शाळा प्रारंभ 

 पहिली ते पाचवीचा निर्णय अजूनही नाही 

         पहिली ते पाचवीचा निर्णय अजूनही नाही

प्रगतीवाहिनी वार्ता;  बेंगळूर;     मुख्यमंत्री बसवराज बोम्माई  यांच्या नेतृत्वात, आज (सोमवारी) बेंगळूरमध्ये झालेल्या तज्ञ आणि अधिकाऱ्यांच्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. सहावी,  सातवी व आठवी ईयत्तांचे नियमित वर्ग सुरू करण्याला सरकारने परवानगी दिली आहे.
         बैठक  संपल्यानंतर  पत्रकारांशी  बोलताना  आर. अशोक यांनी सांगितले की,  सप्टेंबरच्या सहा तारखेपासून सहावी ते आठवीचे नियमित वर्ग सुरू करण्यात येतील. तशी परवानगी सरकारने दिली आहे. हे वर्ग वेगवेगळ्या बॅचमध्ये (गटांमध्ये) विभागणी करून चालवले जातील.  एक दिवसाआड एक दिवस याप्रमाणे बॅच निहाय आणि फक्त अर्धा दिवसच शाळा चालू राहतील. आठवड्यातून फक्त पाचच दिवस शाळा चालतील. तसेच ज्या  भागातील पॉझिटिव्हिटी रेट शेकडा दोन पेक्षा कमी असेल, फक्त अशाच तालुक्यातील शाळा चालू केल्या जातील, असे आर अशोक यांनी सांगितले.