सोलापूर आणि म्हैसूर दरम्यान संपूर्णतः आरक्षित विशेष गाडी

सोलापूर – सोलापूर आणि म्हैसूर दरम्यान दि. १३.९.२०२० पासून पुढील सूचना मिळेपर्यंत विशेष रेल्वेगाडी (साप्ताहिक) चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 06535 विशेष (साप्ताहिक) दि. १२.९.२०२० पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर शनिवारी म्हैसूर येथून  सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सोलापूरला पोहोचेल.
 06536 विशेष (साप्ताहिक) दि. १३.९.२०२० पासून पुढील सूचना मिळेपर्यंत   दर रविवारी सोलापूर येथून  सुटेल आणि  दुसर्‍या दिवशी म्हैसूरला पोहोचेल.
*थांबे* :    ट्रेन क्र.16535/16536 या गाड्यांना ‘निंबल’ आणि ‘अन्निगिरी’ व्यतिरिक्त असलेले थांबे.
 *संरचना* : एक प्रथम सह द्वितीय  वातानुकूलित, एक तृतीय वातानुकूलित, १० शयनयान   आणि गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ द्वितीय आसन श्रेणी.
 *आरक्षण* : 06536 विशेष गाडीचे बुकिंग १०.९.२०२० पासून सर्व आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल.
 प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

Related Articles

Back to top button