
प्रगती वाहिनी न्यूज बेंगळूरू: लॉक डाउन हटवल्यानंतर राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कर्नाटक सरकारने बाहेर राज्यातून येणाऱ्यांच्या कोरंटाईन अवधीत बदल केला जाणार आहे.
महाराष्ट्र ,तामिळनाडू, तेलंगणा, दिल्ली व इतर राज्यातून येणाऱ्या नागरिकांना 14 दिवस कोरंटाईन टाा सक्तीचे केले आहे. यामध्ये सात दिवस इन्स्टिट्यूशनल कोरंटाईन तसेच सात दिवस होम कोरंटाईन करण्याची तयारी करत असल्याचे वैद्यकीय शिक्षण सचिव डॉक्टर के सुधाकर यांनी सांगितले.
राज्याच्या राजधानीत दिवसेंदिवस कोरोनाची केसेस वाढत असून कोरोना वारियर्सना ही लागण होत आहे यामुळे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी बैठक बोलावली असून बैठकीत कोरोना संक्रमित प्रदेशात पुन्हा लॉक डाउन होण्याची शक्यता आहे.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ