रमेश जारकीहोळी यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा लक्ष्मी हेब्बाळकर यांचा विचार
प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी: पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा विचार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले
मंत्री रमेश जारकीहोळी यांनी मंगळवारी सकाळी ग्रामीण भाजप कार्यालयाचे उद्घाटन करताना ग्रामीण क्षेत्रात कुकर माझ्या पैशातून वाटले गेल्याचे म्हटले होते त्याप्रमाणेच येणाऱ्या बेळगावी डीसीसी बँक निवडणुकीत पैसे वाटण्याचे बोलले होते असे समजले आहे.
याला प्रतिक्रिया देताना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आम्ही आमच्या हर्षा शुगर याच्या उद्घाटन संबंधात कुकर दिले होते यासाठी सर्व जीएसटी बिल ही आपल्याकडे उपलब्ध आहेत रमेश जारकीहोळी आपल्या पैशावरून कुकर दिले असतील तर त्याचा पुरावा त्यांनी सादर करावा हा विषय न्यायालयात असून या बद्दल बोलणे ही न्यायालयाची निंदा आहे. यासंबंधी मी माझ्या वकिलाशी बोलले असून रमेश जारकीहोळी यांचा व्हिडिओ पूर्णपणे पाहून दोन-तीन दिवसात बेंगलोर येथे वकिलांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही हर्षा सुगर्स मधून कुकर दिल्याबद्दल इन्कम टॅक्स खात्याला माहिती दिली आहे याबद्दल या खात्याने आम्हाला परवानगी दिली होती माझे पैशात माझ्या पैशातून डुक्कर वाटल्याचे बोलणाऱ्या जारकीहोळी यांनी सबळ पुरावे द्यावेत नाहीतर आपण इन्कम टॅक्स खाते तसेच केंद्र सरकारला जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येणाऱ्या बेळगावी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आपण पैसे वाटणार असल्याचे रमेश जारकीहोळी यांनी सांगितले आहे याबद्दल आपण निवडणूक आयोगाकडे पुराव्यासहित तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आपण मंत्री झाल्याने काही बोलले तर खपवून घेतले जाते या अंधविश्वास आतून त्यांनी बाहेर पडावे गोकाक या जनतेने येडीयुरप्पा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी त्यांना निवडून दिले आहे आता तरी त्यांनी आपला अहंकार सोडून जबाबदारीने वागावे असा इशारा लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिला
माजी आमदार संजय पाटील यांच्यावर अन्याय झाला असल्याचे बोलणाऱ्या रमेश जारकीहोळी यांनी ग्रामीण क्षेत्राचे टिकीट द्यावे तसेच त्यांना निवडून आणतो अशी घोषणा करावी उगीच कार्यकर्त्यांची दिशाभूल करू नये असे लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.
मी कित्तूर राणी चन्नम्माची वांवश्ट असून अशा खोट्या भाषणाला घाबरत नाही आपलं स्वाभिमान बेळगावी जिल्हा अशा नेत्यांच्या हाती जाऊ देणार नाही असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
जिथे जाईल तिथे बेळगाव ग्रामीण क्षेत्रांमध्ये पैसे वाटतो डीसीसी बँकेच्या निवडणुकीतही पैसे वाटतो असे म्हणणारा रमेश जारकीहोळी यांनी उसाचे बिल न मिळालेला कित्तूर बैलहोंगल या भागातील शेतकरी आत्महत्या करत आहेत संती बस्तवाड वीर किन कोप्पा ज्या भागातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये द्यावेत असे आवाहन लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ