बेळगावी, अथणी तालुक्यात रुग्ण संख्येत वाढ, परिचारिका, एक्स-रे टेक्निशियनला तसेच, डॉक्टर दांपत्यालाही बाधा
प्रगती वाहिनी न्यूज बेळगावी: अथणी तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच आहे. गेल्या 24 तासांत बेळगाव शहर व उपनगरातील 15 जणांसह एकूण 31 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र, राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये याचा उल्लेख नाही. जिल्हय़ातील बाधितांची संख्या 475 वर पोहोचली आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 13 जण दगावले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागातही कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कंग्राळ गल्ली येथील 23 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. तर मध्यवर्ती भागातील एका डॉक्टर दांपत्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवा बजावणाऱया 33 वषीय परिचारिकेला कोरोनाची लागण झाली आहे. याच इस्पितळातील 33 वषीय एक्स-रे टेक्निशियनलाही कोरोनाची लागण झाली आहे.
याबरोबरच आझमनगर, आदर्श कॉलनी, उज्ज्वलनगर, इंदिरा कॉलनी, शिवबसवनगर परिसरात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. अथणी तालुक्मयातील कृष्णा कित्तूर, मंगावती, किरणगी, जुगुळ परिसरातील 14 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गोकाक तालुक्मयातील कौजलगी व रामदुर्ग तालुक्मयातील हिरेकोप्प येथील प्रत्येकी एकाला कोरोनाची बाधा झाली आहे.
हनुमाननगर येथील कोरोनाबाधित डॉक्टर दांपत्याला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करणाऱया एकूण 7 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये तीन डॉक्टर तरुणी, दोन एक्स-रे टेक्निशियन व दोन परिचारिकांचा समावेश आहे. डॉक्टर तरुणींना खासगी इस्पितळात हलविण्यात आले आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केवळ कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी इतर विभाग जवळजवळ बंद करण्यात आले आहेत. खासकरून सर्जरी व ऑर्थोपेडिक विभागाचे ऑपरेशन थिएटरही बंद करण्यात आले असून याच विभागात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. तरीही जागा अपुरी पडण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य आजारांवर उपचार मिळणे कठीण जात आहे.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील 6 हजार 109 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 366 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात 115 हून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
30 हजार जणांची स्वॅब तपासणी
आतापर्यंत जिल्हय़ातील 30 हजार 472 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 26 हजार 668 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून प्रशासनाला आणखी 2 हजार 722 अहवालांची प्रतीक्षा आहे. आयसीएमआरमधील कर्मचाऱयाला कोरोनाची बाधा झाल्यामुळे तेथील तपासणी सध्या बंद आहे. त्यामुळे प्रलंबित स्वॅबची संख्या वाढत चालली आहे.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ