Kannada NewsKarnataka News
ग्रामीण मतदारसंघातील लोकांच्यात असलेली अनाथपणाची भावना आता दूर झाली आहे- लक्ष्मी हेब्बाळकर
लोक आता मतदारसंघात विकास पाहत आहेत
प्रगतीवहिनी न्युज / बेळगावी – मी आमदार होत असताना ग्रामीण मतदारसंघातील लोकांच्यात असलेले विकासाचे स्वप्न हरपण्याच्या स्थितीत होते. लोकप्रतिनिधी व व्यवस्थेवरील विश्वास लोकांचा उडाला होता. पण मी लोकांच्या जवळ जाऊन त्यांच्यात विश्वास निर्माण करण्याचे काम करीत आलो. दिलेली सर्व आश्वासने टप्प्या टप्प्याने पूर्ण करीत आले. त्यामुळे लोक आज मतदारसंघात विकास पाहत आहेत. त्यांच्यातील अनाथपणाची भावना दूर झाल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी टोला लगावला.
बेळगावी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील येळेबैल गावात श्री दुर्गामाता मंदिर उभारणी कामाचे भूमिपूजन करून त्या बोलत होत्या.
मतदारसंघाच्या विकासासाठी एक दिवस विश्रांती न घेता निरंतरपणे बेळगाव-बेंगळूर फेऱ्या मारल्या आहेत. प्रत्येकवेळी बेंगळूरला जात असताना डझनभर प्रस्ताव घेऊन गेले आहे. मतदारसंघाच्या विकासात मागील कांही दशकांमध्ये झालेली माघार दूर करण्यासाठी माझ्यातील सर्व शक्तीपणाला लावून प्रयत्न केले आहे. देवाने व मतदारसंघातील लोकांच्या आशिर्वाद माझ्यावर असल्याने हे सर्वकांही शक्य झाल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
यावेळी गावांतील ज्येष्ठ, युवराजणा कदम , मनोहर बेळगावकर, महेश पाटील, मनोहर पाटील, रावळू पाटील, प्रेमा बाळेकुंद्री, दुर्गा पाटील, परशुराम पाटील, मल्लप्पा मरगाळे, मारुती दत्तू पाटील, विठ्ठल औळकर, नामदेव मरगाळे, ओमनी, यळ्ळूरकर, गुंडू पाटील, मोनप्पा मरगाळे व कार्यकर्ते उपस्थित होते.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ