Kannada NewsKarnataka News
सतीश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांची मतदारांना विनंती

काँग्रेस उमेदवार राजश्री नाईक यांनाच मते द्या
प्रगतीवाहिनी; बेळगावी; केपिसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, आणि बेळगावी ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, यांनी मंगळवारी काँग्रेस उमेदवारांसाठी प्रचार केला.
मंगळवारी वार्ड क्रमांक 45 च्या वैभव नगर, न्यू वैभव नगर आणि इन्डाल कॉलनी भागात दौरा करून, केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, आणि बेळगावी ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, यांनी स्थानिक काँग्रेस उमेदवार राजश्री नायक यांचा प्रचार केला. काँग्रेस उमेदवार राजश्री नाईक यानाच मते द्यावीत, अशी आग्रहपूर्वक विनंती, त्यांनी मतदारांना केली. बेळगावी शहराच्या संपूर्ण विकासासाठी. कॉंग्रेस. पक्षाच्या उमेदवारांनाच मते देऊन बेळगावचा विकास करण्याची संधी द्यावी अशी विनंती त्यांनी केली.
यावेळी, ज्येष्ठ नागरिक, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार फिरोज सेठ, सिद्राय बेळगावी, अनिल पावशे, अडीवेप्पा हत्तरगी, गंगाप्पा नंदी आणि इतर उपस्थित होते.




