प्रगतिवाहिनी न्यूज / चिकोडी – स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री बोमाई यांनी राज्यात अमृतग्राम योजना जाहीर केले आहेत. या योजनेतर्गत 750 ग्राम पंचायतीची निवड करून विशेष निधी दिला जाणार आहे. या योजनेसाठी आपण जागणुर ग्राम पंचायतीच्या नावाची शिफारस करणार आहे. जागणुर आदर्श ग्राम करणार असल्याचे प्रतिपादन राज्य सरकारचे मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ यांनी दिले.
आज तालुक्यातील जागणुर येथील दूरदूनडेश्वर मळ्यानजीक व गवीसिद्धेश्वर मंदिरानजीक पूल वजा बंधाऱ्याचे व ग्राम पंचायत हायटेक ग्रंथालयाचे उदघाटन करून ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले आपण या गावातील रस्त्यासाठी 60 लाखांचा निधी दिला आहे. तर आता पूल बंधारे निर्मितीसाठी आपण व आमदारानी 2 कोटींचा निधी दिल्याचे सांगितले. नागरिकांच्या मागणीनुसार पशु इस्पितळ मंजूर व ग्रा प च्या इमारतीचा विस्ताराचे काम मंजूर करून देऊ असे सांगितले.
यावेळी बोलताना रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे म्हणाले रायबाग मतदारसंघात सर्वाधिक विकासकामे जागनूर गावात आपण राबविली आहेत. या गावात पुढील काळात आणखीन विकासकामे राबविणार असून नागरिकांचे सहकार्य असेच लाभू दे असे सांगितले.
यावेळी जिल्हा पंचायत सदस्य पवन कती यांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी हिराशुगरचे संचालक सुरेश बेलद, पीकेपीएस अध्यक्ष हणमंत रबकवी, रामप्पा पुकाटे, ग्रा प अध्यक्षा सौ महादेवी सनदी, लक्ष्मण हनमनवर, सिदु खिंडी, ता प कार्यकारी अधिकारी विरणगौडा ऐगनगौडर, पीडिओ रविंद्र दशवंत यांच्यासह इतर उपस्थित होते.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ