चिकोडी लोकसभा मतदारसंघात 650 गावामध्ये सीएससी केंद्र सुरू करणार : खासदार अण्णासाहेब जोले
प्रगतीवहिनी न्यूज / चिकोडी – आपल्या लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात नागरी सेवा मिळाव्यात यासाठी डिजिटल सेवा केंद्र उघडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रतिपादन खासदार आण्णासाहेब जोले यांनी दिले.
तालुक्यातील एकसंबा येथील शिवशंकर जोल्ले पब्लिक शाळेच्या सभागृहात ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेड (डिजिटल सेवा केंद्र) आणि जोल्ले उद्योग समूह यांच्या विद्यमाने कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) प्रशिक्षण कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाने उदघाटन करून ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले ग्रामीण भागातील लोकांना नजीकच्या शहरात किंवा तालुक्याच्या ठिकाणी नागरी सेवेसाठी जावावे लागते. यामुळे वेळ व पैसा वाया जातो. यामुळे त्यांच्याच गावात नागरी सेवा देण्याच्या दृष्टीने डिजिटल सेवा केंद्र उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या केंद्रामध्ये उतारा, आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, फसल विमा योजना, आयुष्मान भारत, बस, रेल्वे तिकीट बुकिंग, फस्ट टॅग, पासपोर्ट, पंतप्रधान लघु उद्योग मान धन योजना यासह 100 हून अधिक नागरी सेवा मिळवून देण्यात येईल. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील 650 गावांमध्ये हे केंद्र उघडण्याचे ध्येय असल्याचे सांगीतले.
यावेळी सिध्दीविनायक सौहार्द सहकारी संस्थेचे संस्थापक संजय अडके, कर्नाटक राज्य ग्रामीण ई-स्टोअर व्यवस्थापक किरण जोशी, सी.एस.सी जिल्हा व्यवस्थापक वीरेश पुराणिकमठ, संजय अरगे आणि इच्छुक उपस्थित होते.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ