पिशव्या खरेदीत सहा कोटींचा भ्रष्टाचार
प्रगतीवाहिनी वार्ता; मैसूर; म्हैसूरच्या माजी जिल्हाधिकारी रोहिणी सिंधुरी यांची बदली झाली
असली तरीही, त्यांच्यावर आरोप करणे सुरूच आहे कपड्याच्या बॅग खरेदी व्यवहारामध्ये त्यांनी सहा
कोटींचा अपहार केला आहे असा गंभीर आरोप आता आमदार सारे पाटील यांनी केला आहे.
म्हैसूरमध्ये बोलताना आमदार सा रे पाटील म्हणाले की, प्लास्टिकमुक्त म्हैसूर योजनेसाठी रोहिणी यांनी
जोरदार मोहीम सुरू केली होती. त्यावेळी त्यांनी पालिकेच्या कौन्सिलची संमती न घेताच, स्वतःच्या अधिकारात 14,71,458 कपड्याच्या पिशव्या खरेदी केल्या आणि त्यामध्ये सहा कोटी रुपयांचा अपहार केला, असा आरोप आमदार सा रे पाटील यांनी केला. पुरवठादाराने 7 कोटी 55 लाख रुपयांना या, हातमागावरील कापडी पिशव्यांचा पुरवठा केला आहे. प्रत्यक्षात या पिशव्यांची किंमत 1 कोटी 47 लाख 15 हजार रुपये असताना, सात कोटी रुपयांना खरेदी झाली आहे. या व्यवहारातून रोहिणी यांनी सहा कोटी रुपयांचा अपहार केला आहे. याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी, मी सीएसकडे पत्राद्वारे करीत आहे. त्यानी जर यावर कारवाई केली नाही तर, मी त्यांच्या घरासमोर अन्न सत्याग्रह करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.
बेळगावी पालिकेवर कोणाचेच नियंत्रण नाही -आमदार लक्ष्मी हेब्बाळकर
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ