रेल्वे मार्गासाठी जमिनी दिल्या तर लवकरच रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात – राज्य रेल्वेमंत्री सुरेश अंगडी
प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी: कुडची – बागलकोट रेल्वेमार्गासाठी जर जमिनी हस्तांतरणाचे काम लवकर झाले तर या मार्गाच्या कामकाजाची सुरुवात त्वरित सुरू करण्यात येईल असे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आलेल्या बेळगावी आणि बागलकोट जिल्हाधिकारी तसेच रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
एकदा रेल्वे खात्याकडे जमिनी स्वाधीन झाल्या तर डीपीआर तसेच अनुदान मंजुरीसाठी पाठपुरवठा होईल, यासाठी बाकी राहिलेल्या जमिनीही रेल्वेमार्गासाठी स्वाधीन करून घ्याव्यात अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
संपूर्ण जमिनी पुरवठा तसेच नवीन रेल्वेमार्गाच्या खर्चाची 50 टक्के रक्कम राज्य सरकार देणार असल्याने येथील स्थानिक आमदार व जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे.
रेल्वे मार्ग जाणाऱ्या जागेची माहिती पंधरा दिवसात रेल्वे खात्याने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी व संबंधितांनी भू स्वाधीन करण्यास सुरुवात करावी अशी सूचना रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांनी दिली.
बागलकोट येथील राहिलेली 141 जमीन लवकरच हस्तांतरित करून घ्यावी, तसेच वनविभागाची 41 एकर जमीनही लवकर हस्तांतरित करून घ्यावी अशी सूचना स अंगडी यांनी केली.
आमदार वीरांना चारांतीमाठ यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन आदेश दिला तर कामकाजाला गती मिळेल अशी विनंती सुरेश अंगडी यांच्याकडे केली.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ