Advertisement -Home Add

चिकोडी सरकारी इस्पितळ सिलडॉउन 

एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण 

 प्रगतिवाहिनी न्युज /  चिकोडी –  कोरोना रुग्णांसह इतर शेकडो रुग्णांवर उपचार करणाऱ्या इस्पितळातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे चिकोडी तालुका सरकारी इस्पितळ सिलडॉउन करण्यात आले आहे.
   याबद्दल अधिक माहिती अशी की चिकोडी शहरातील तालुका सरकारी इस्पितळात सुरक्षा विभागात समुपदेशक पदावर कार्यरत 40 वर्षीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर कर्मचाऱ्याला कोरोना ड्युटीवर घालण्यात आले होते.  तसेच तो राहणाऱ्या चिकोडीतील प्रभुवाडी येथे सापडलेल्या कोरोना पोजिटिव्ह रुग्णाच्या रूमशेजारी याची रुम आहे. यामुळे रुग्णाच्या प्राथमिक संपर्कात नाव असल्याने सव्याबचे नमुने घेण्यात आले होते. त्याचा आज पोजिटिव्ह रिपोर्ट आल्याने सरकारी इस्पितळात एकच खळबळ माजली.
  यानंतर सर्व कर्मचार्यांना घरी जाण्यास सांगून दोन दिवसांसाठी इस्पितळ सीलडॉउन करण्यात आले.
   सद्या इस्पितळात 5 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दोन दिवसानंतर पुन्हा सामान्य  रुग्णांसाठी इस्पितळ सुरू करण्यात येणार आहे. एखाद्या वेळी कर्मचाऱ्यात कोरोनाची लक्षणे आढळल्यास सव्याब नमुने टेस्ट करणार असल्याची माहिती इस्पितळाचे मुख्य वैद्याधिकारी डॉ  .संतोष कोनुरे यांनी दिली