Advertisement -Home Add
Chandargi Sports School
Wanted Home Add

एकाच दिवशी 2313 जणांना कर्नाटकात कोरोना

57 जणांचा मृत्यू,राजधानीत एकाच दिवशी 1447 कोरोना बाधित

प्रगती वाहिनी न्यूज, बेंगलोरू: राज्यभरात कोरोनाने थैमान घातले असून कोरोना दिवसेंदिवस रुद्रावतार धारण करत आहे आज एकाच दिवशी 2313 केसेस निदान झाले असून कर्नाटकात एकूण कोरोना ग्रस्तांची संख्या 33 हजार 418 इतकी झाली आहे.
याबद्दल माहिती देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री के सुधाकर यांनी राज्यभरात आज 2313 नवीन केसेस आले असून यामध्ये एक राजधानी बेंगलोर येथे 1447 जन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर आज 57 जणांचा मृत्यू झाला आहे.
बेळगाव जिल्ह्यातही पंधरा जणांना कोरोना झाला असून दक्षिण कन्नड 139, विजयापुर 89, बल्लारी 66, कलबुर्गी 58, यादगिरी आणि मैसूर 51, धारवाड 50 ,हावेरी 42 ,उडुपी 34, उत्तर कन्नड 33 ,मंड्या 31, रायचूर रामनगर 23, दावणगेरे 21, बिदर आणि गदक प्रत्येकी 19 चिकबळ्ळापूर 12 तुमकुरू 10 कोलार आणि चामराजनगर प्रत्येकी नऊ, कोप्पल साथ, हासण, शिमोगा ,बागलकोट प्रत्येकी सहा बेंगलोर ग्रामीण, चिक्कमगळूरू प्रत्येकी एक अशी राज्यभरात आढळलेल्या प्रकरणाची संख्या आहे