Kannada NewsKarnataka News

विनायकनगर  प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविडशिल्ड लस देण्यास शुभारंभ

बेळगावि : बुधवारी विनायक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविडशिल्ड लस देण्यास शुभारंभ करण्यात आला.
कोविडशिल्ड लस केंद्राचे उदघाटन माजी नगरसेवक अनुश्री देशपांडे, डॉ अनुपमा तुक्कार फीत कापून करण्यात आले.
त्यानंतर नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ संजय डुमगोळ, डी एस यु ऑफिसर बी एन तुक्कार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून लस देण्याला चालना देण्यात आली.
सध्या कोरोना वोरीयर्स ,आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या , अंगणवाडी कर्मचारी एकूण 110 जणांना कोरोना लस देण्यात आली.
यावेळी एस वी रेडी, संब्यामथ तसेच आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा कार्यकर्त्या ,अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Related Articles

Back to top button