Advertisement

सर्वांना उत्तर देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही -आमदार लक्ष्मी हेब्बाळकर

मार्केट यार्ड अध्यक्ष निवडीबद्दल दिलेल्या जारकीहोळी यांच्या वक्तव्याला तीक्ष्ण प्रतिक्रिया

प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी: विचारलेला सर्व प्रश्नांसाठी माझ्याकडे उत्तर देण्यास वेळ नाही मी फक्त विकासावर लक्ष केंद्रित करते राज्यात पुन्हा एकदा काँग्रेस सरकार येण्यासाठी प्रयत्न करते असे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितल्या.


पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी मार्केट यार्ड अध्यक्ष युवराज कदम यांची निवड आपल्यामुळे झाल्याची वक्तव्य केले होते यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अशा शुल्लक प्रश्नांना माझ्यासाठी उत्तर देण्यासाठी वेळ नसल्याचे सांगितले.
पेट्रोल-डिझेल दरवाढी संदर्भात काढण्यात आलेल्या रॅलीत लक्ष्मी हेब्बाळकर बोलत होत्या, आमदार सतीश जारकीहोळी यांनी मागच्याच वर्षी युवराज कदम यांना अध्यक्ष बनवण्याची ग्वाही दिली होती याची पूर्तता आता झाली असून यासंदर्भात अधिक माहिती तुम्हाला सतीश जारकीहोळी देतील. काँग्रेस पक्षाने मला भरपूर जबाबदारी दिली असून ती पूर्तता करण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे अशा शुल्लक भाषणांवर उत्तर द्यायला वेळ नसल्याचे सांगीतले.
या अगोदर लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने पेट्रोल व डिझेल दरवाढीबाबत तीव्र आंदोलन केले, फक्त भाषणे न करता जनतेच्या मूलभूत गरजांकडे केंद्र सरकारने लक्ष द्यावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले.
रॅलीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.