Advertisement

ग्रामीण भागाचा विकास हे एकच ध्येय -लक्ष्मी हेब्बाळकर

बेळगावी कृषी उत्पन्न बाजार समितीच्यां व्यापाऱ्यांनी शनिवारी आयोजित केला सत्कार समारंभ

 

प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी: बेळगावी ग्रामीण क्षेत्रात भाषेचे राजकारण चालत नसून येथे फक्त विकासाचा अजेंडा चालतो ग्रामीण भागातील जनता खूप हुशार असून काम करणाऱ्यांना ते प्रोत्साहन देतात असे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.
बेळगावी कृषी उत्पन्न बाजार समितीच्यां व्यापाऱ्यांनी शनिवारी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. काँग्रेस चे वरिष्ठ सदस्य असलेले युवराज कदम हे कृषी उत्पन्न बाजार समिती चे अध्यक्ष म्हणून अविरोध निवडून आलेले आहेत. केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्यासोबत यांच्यासहित सर्वांनी यासाठी सहकार्य केले आहे सर्वांना विश्वासात घेऊन युवराज कदम यांनी चांगले काम करावे असे हेब्बाळकर यांनी सांगितले.
मी काही काम हातात घेतले तर ते संपूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही विकास हे एकच माझे ध्येय असून यासाठी सर्वांचे सहकार मला हवे आहे. आमदार निधीतून दहा लाख रुपये काढून शुद्ध पिण्याच्या पाण्याचा घटक निर्माण केला जाईल. आताचे एपीएमसी मिनिस्टर पहिला काँग्रेसमध्ये होते व त्यांची चांगली ओळख असल्याने एपीएमसीला हवी असणाऱ्या सर्व कामे त्यांच्याकडूनच करून घेऊ, एपीएमसीच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू असे लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.
आपण सर्वांनी राजकारण सोडून एपीएमसी सोबत शेतकऱ्यांच्या विकासाचा विचार करावा जेव्हा इलेक्शन येते त्यावेळेला राजकारण करू आता फक्त विकासाकडे लक्ष देऊ अशी घोषणा हेब्बाळकर यांनी केली.
कार्यक्रमात एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, सुरेश चौगुले, चेतन खांडेकर ,अनु कांबळे, ए एन जांगरूचे आदी उपस्थित होते.