Kannada NewsKarnataka NewsLatest

ग्रहनिर्माण आदेश पत्रांचे वितरण; वंचितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर

 प्रगतीवाहिनी वार्ता; बेळगावी; ऑगस्ट 2019 मध्ये राज्यात अनेक ठिकाणी महापुराने थैमान घालून अनेक गरीब नागरिकांची घरे जमीनदोस्त केली होती. त्यावेळी माविनकट्टी गावातील अनेक घरे सुद्धा नुकसानग्रस्त झाली होती.

या घरांची बांधणी किंवा दुरुस्ती /डागडुजी करण्यासाठी पंधरा लाभार्थिना आदेश पत्रे मिळवून देण्यासाठी बेळगावी ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पूर्ण पाठपुरावा करून, त्यांची मदत केली आहे.

तब्बल दोन वर्षे पर्यंत या पुरग्रस्त लाभार्थींना समस्यांचा परिहार झाला नव्हता. या लाभार्थींची समस्या सुटली नव्हती. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या सततच्या प्रयत्नाने लाभार्थींची समस्या सुटल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरून समाधान आणि कृतज्ञतेचे हसू ओसंडून वहात होते. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या अनुपस्थितीत, या आदेशपत्रांचे वितरण, लक्ष्मीताई को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन चन्नराज हट्टीहोळी यांनी केले. आदेश पत्रे वितरण समारंभात ज्येष्ठ नागरिक सिद्राय गडाद, उळवाप्पा मल्लण्णावर, चन्नाप्पा हिरेहोळी आणि लाभार्थी उपस्थित होते. सर्व लाभार्थींनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

 

Home add -Advt

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ

Related Articles

Back to top button