शहरातील सिव्हिल पोलीस स्थानाकात कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला कोरोना पोजिटिव्ह असल्याचा अहवाल आज आल्यानंतर खळबळ माजली आहे. यानंतर लागलीच सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर पाठवून देण्यात आले. यानंतर सम्पूर्ण पोलीस स्थानक निर्जंतुकीकरण करून पोलिस स्थानक सीलडाऊन करण्यात आले.
पोलीस स्थानकासमोर काठीचे कटआऊट बांधून बंद करण्यात आले होते. त्यामुळे आज दिवसभर पोलीस स्थानक बंद ठेवण्यात आले होते.
सदर महिला कॉन्स्टेबल तीन रजेवर होत्या. आजारी असल्यामुळे रॅपिड टेस्ट करण्यात आल्यानंतर अहवाल पोजीटिव्ह आल्यानंतर त्यांना मजलट्टी येथील केंद्रात ठेवण्यात आले आहे.
पोलीस कर्मचार्याला कोरोना झाल्यामुळे स्थानकातील इतर कर्मचऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ