प्रगती वाहिनी न्यूज ,बेळगावी: गुरुवारी बेळगावी ग्रामीण विधानसभा क्षेत्रात एक उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते कार्यकर्त्यांनी केलेल्या जयघोष सर्वत्र जत्रेचे वातावरण निर्माण केले होते
भारताच्या राजकीय इतिहासामध्ये केपीसीसी अध्यक्षांचा पदग्रहण समारंभ बेळगावी ग्रामीण क्षेत्राच्या भागांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. मराठी आणि कन्नड जनता असलेल्या या क्षेत्रातील कराडीगुद्दी, मारीहाल, सुळेभावी, मोदगा, बाळेकुंद्री बिके, बाळेकुंद्री Kh, माविन कट्टी ,तारीहाल, सांब्रा,चंदांहोसुर, शिंडोल्ली, मुतगा, हिरे बागेवाडी, बाडाल अंकलगी, मुतनाळ, अरळीकट्टी, भेंडीगिरी ,इनाम बडास, कुकटोळी संती बस्तवाड, कोंडास्कोप ,के के कोप्प, नंदिहल्ली,राजहंसगड , बेळवाट्टी, बिजगरणी ,अतिवाड उचगाव ,तुरमुरी, कुद्रेमनी, कंग्राळी के एच, बेळगुंदी, सुळगा, हंगरगा, तुमरीगुद्दी याठिकाणी मोठ्या उत्साहाने पदग्रहण समारंभ साजरा करण्यात आला.
पदग्रहण समारंभाचा थेट प्रसारण सुरू होताच जनतेने एकत्र येऊन पदग्रहण समारंभ आनंद लुटला प्रत्येक गावाच्या मंदिरांमध्ये पदग्रहण समारंभ यशस्वी होण्यासाठी अभिषेक व पूजा करण्यात आली.
या आनंदोत्सवात कार्यकर्त्यांनी डीके शिवकुमार यांना शुभेच्छा दिल्या तर लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सरकार स्थापनेत विजय हो अशी घोषणा केली
एकूण सांगायचे झाल्यास पदग्रहण समारंभ जनतेचे जनता तसेच कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने पूर्णपणे यशस्वी झाला असून पक्ष संघटना करून पुन्हा एकदा राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला तसेच कार्यकर्त्यांचा तसे जनतेचा विश्वास आपल्यावर असून असाच विश्वास आपल्यावर जनतेने ठेवल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
तुमचं प्रेम आणि पाठिंबा असाच माझ्या पाठीशी राहू दे-लक्ष्मी हेब्बाळकर
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर बेंगळुरू येथील कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या तर त्यांचे बंधू चनराज हट्टीहोळी, मुलगा मृणाल हेबाळकर ,काँग्रेस नेते एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम असे शेकडो कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ