Kannada NewsKarnataka NewsLatest

एकाच दिवशी पंधरा हजार 413 जणांना कोरोना

प्रगती वाहिनी न्यूज, न्यू दिल्ली: देशात कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत असून गेल्या चोवीस तासात पंधरा हजार 413 जणांना कोरोना झाल्याचे आढळले आहे.
यामुळे देशभरात कोरोना संक्रमित यांची संख्या चार लाख दहा हजार 461 इतकी झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
गेल्या चोवीस तासात 306 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूंची संख्या 13 हजार 254 इतकी झाली आहे तर दोन लाख 27 हजार 755 जण कोरोना मुक्त झाले आहेत आणि एक लाख 69 हजार 451 त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
इतर राज्यांशी तुलना करता महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असून आतापर्यंत एक लाख 28 हजार 205 लोकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे तर दिल्ली येथे 56 हजार 746 जणांना करना झाल्याचे समजते.

Home add -Advt

Related Articles

Back to top button