Kannada NewsKarnataka News
दहावीच्या परीक्षेसाठी आमदार अनिल बेनके यांच्याकडून मोफत वाहन सेवा

प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी: बेळगावी उत्तर मतदार क्षेत्र चे आमदार अनिल बेनके यांनी उद्यापासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांना आप आपल्या परीक्षा केंद्रात जाण्यासाठी मोफत वाहनांची व्यवस्था केली आहे.
राज्यात covid-19 ची प्रकरणे वाढली असल्यामुळे दहावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या यासाठी उद्यापासून परीक्षांना सुरुवात होत असून सर्व गरीब विद्यार्थी तसेच पालकांनी या मोफत वाहन सेवेचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मास्क सानी टायझर तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या तपासणीची ही व्यवस्था केली असून जर एखाद्या विद्यार्थ्याला अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्याच्यासाठी वेगळ्या कोठडीची ही व्यवस्था केल्याचे ते म्हणाले.
यावेळी भाजप कार्यकर्ते तसेच ऑटो रिक्षा चालक उपस्थित होते.




