साधेपणाने सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी
प्रगतीवाहिनी वार्ता; बेंगलोर; अटींच्या पालनासह साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याला सरकारने परवानगी दिली आहे.
या विषयावर निर्णय घेण्यासाठी, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वात, अधिकारी आणि तज्ञांची बैठक आज (रविवारी) आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीनंतर बोलताना मंत्री आर अशोक यांनी सांगितले की, या वर्षी फक्त पाच दिवसांच्या काळासाठी सार्वजनिक गणेशोत्सव पालनाला काही अटीवर परवानगी देण्यात आली आहे.
गणेशोत्सवाची मार्ग सूची
1) सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे अत्यावश्यक आणि सक्तीचे आहे.
2) गणेशोत्सव संघटकांनी कोविड लस घेतली असली पाहिजे.
3) पर्यावरण नियम पूर्वक बनवलेली मूर्तीच वापरावी.
4) सरकारी किंवा रिकाम्या जागी मूर्ती स्थापना करू शकता.
5) मूर्ती स्थापनेच्या ठिकाणी लसीकरण अभियान चालवले पाहिजे.
6) शहरांमध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये फक्त एकाच गणेशमूर्तीची स्थापना करण्याचे बंधन राहील.
7) ग्रामीण भागात किंवा खेड्यामध्ये याबद्दलचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात घेण्यात येईल.
8) गणेशोत्सवाचा मंडप कमीत कमी पन्नास फूट बाय पन्नास फूट मापाचा असावा.
9) कोणत्याही प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम डी जे कार्यक्रम किंवा वापर यांना परवानगी नाही.
10) गणेश विसर्जनावेळी मिरवणूक काढण्यास आणि वाद्य वाजवण्यास बंदी.
11) मंडळाच्या ठराविक सदस्यांकडून आणि ठरलेल्या ठिकाणीच विसर्जन करावे.
12) खेड्यामध्ये तलाव मूर्ती तलावामध्ये मूर्ती विसर्जनाला परवानगी.
13) जिल्हा जर इतर राज्यांच्या सीमेवर असेल तर covid-19 पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्केपेक्षा कमी असेल तरच सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी असेल, दोन टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी नाही.
14) शाळा-कॉलेजमध्ये मूर्ती स्थापना करायला परवानगी नाही.

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ