Kannada NewsKarnataka News

पौर्णिमेनिमित्त बेळगाव येथील रांगोळी आर्टिस्ट अजित औरवाडकर यांनी श्री स्वामी समर्थांची रांगोळी

प्रगती वाहिनी न्यूज बेळगावी : गुरु पौर्णिमेनिमित्त बेळगाव येथील रांगोळी आर्टिस्ट अजित औरवाडकर यांनी श्री स्वामी समर्थांची रांगोळी काढली असून ही रांगोळी काढण्यास त्यांना बारा तास लागले.

गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून आर्टिस्ट अजित औरवाडकर यांनी दोन बाय तीन फूट आकाराची श्री स्वामी समर्थांची रांगोळी काढली आहे.ही रांगोळी काढण्यासाठी विविध रंगांच्या लेक रांगोळीचा वापर औरवाडकर यांनी केला आहे.तब्बल बारा तास एकाग्रता साधून अजित औरवाडकर यांनी रांगोळी काढली आहे.श्री स्वामी समर्थांच्या चेहऱ्यावरील भाव रांगोळीत हुबेहूब रेखाटणे आव्हानात्मक होते पण श्री स्वामी समर्थ कृपेमुळे रांगोळी पूर्ण झाल्याची भावना आर्टिस्ट अजित औरवाडकर यांनी व्यक्त केली.

नागरिकांना ही रांगोळी 8 जुलै पर्यंत ज्योती फोटो स्टुडिओ ,वडगाव येथे सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत पाहता येईल.

Home add -Advt

Related Articles

Back to top button