
प्रगतिवाहिनी न्यूज / सौन्दती
सौन्दती येथील हर्षा शुगर्समध्ये 2021-22 व्या सालाचा ऊस गळीत हंगामाला बॉयलर प्रदीपन करून हुली सांबयन मठाचे उमेश्वर शिवाचार्य स्वामीजीनी शुक्रवारी चालना दिली.
तसेच कारखान्याला मागील वर्षात जास्त ऊस पुरवठा केलेल्या 10 शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे कारखान्याटील कर्मचाऱ्यासाठी बांधलेल्या वसतीगृह व नवीन कंट्रोल रूमचा वास्तुशांति करण्यात आला.
याप्रसंगी हर्षा शुगर्सचे चेअरमन लक्ष्मी हेब्बाळकर, व्यवस्थापकीय संचालक चनराज हट्टीहोळी, संचालक मृणाल हेब्बाळकर, जनरल मॅनेजर सदाशिव थोरात, केन जनरल मॅनेजर एन एम पाटील, कारखान्याचे मुख्य प्रशासक चौकीमठ, सर्व सदस्य, बेळगावी ग्रामीण, बैलहोंगल, कितुर व सवदती भागातील शेतकरी नेते उपस्थित होते.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ