बेळगावी/ प्रगतिवहिनी न्युज : चिरंजीव मृणाल हेब्बाळकर यांच्या विवाहानंतर परंपरेनुसार आमदार लक्ष्मी हेब्बाळकर कुटुंबासमवेत सोमवारी घरचे कुलदैवत श्री ज्योतीबा देवस्थानाला भेट देऊन विशेष पूजा करून दर्शन घेतले.
नवदांपत्य व दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी परंपरेनुसार वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिबा व कोल्हापूर श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन पूजा व अभिषेक करण्यात आला.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र, राज्य युवा काँगेसचे प्रधान सचिव मृणाल हेब्बाळकर व भद्रावतीचे आमदार संगमेश यांचे भाऊ बी.के.शिवकुमार यांची मुलगी डॉ हिता यांचा विवाह 27 नोव्हेंबर रोजी पार पडला होता.
या मंगलकार्यानंतर परंपरेनुसार घरचे कुलदैवत व इतर आराध्य देवतांचे दर्शन नवदांपत्य व कुटुंबातील सदस्यांनी घेतले.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ