Ghataprabha

पावसासाठी वरुणराजाला साकडे

चवाट गल्लीतील नागरिकांनी बहुसंख्येने पूजाअर्चेत सहभाग

प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी: सीमाभागातील  अनेक भागात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असून मागील 20 ते 25 दिवसांपासून सीमाभागात समाधानकारक पाऊस कोसळला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धानपीक करपले आहे. जमिनीला भेगा जाऊन वाळवी लागली आहे. त्यामुळे चवाट गल्लीतील शेतकऱ्यांनी लक्ष्मीटेक येथील असलेल्या पुरातन महालक्ष्मी मंदिरात आणि शिवलिंगावर जलाभिषेक करून पावसासाठी देवाला साकडे घातले. यावेळी चवाट गल्लीतील नागरिकांनी बहुसंख्येने पूजाअर्चेत सभाग दर्शविला होता. त्यामुळे धार्मिक उत्सवाचे वातावरण मंदिर परिसरात निर्माण झाले होते.

वरुणदेवतेला प्रसन्न करण्यासाठी चवाट गल्लीतील शेतकऱ्यांनी लक्ष्मीटेक येथील मूर्तीची पूजा करून भक्तीभावे आरती केल्यानंतर पाच मुलींची ओटी भरून वरूनदेवताकडे शेकऱ्यांकडून पावसाची मागणी करण्यात आली. यानंतर नैवेद्य दाखवून महाप्रसादाला सुरवात झाली. यावेळी प्रताप मोहिते, उत्तम नाकडी, भाऊ नाईक, किसन रेडेकर, विश्वजीत हसबे, सुनिल जाधव, अमर यळूरकर,दिगंबर पवार,चंद्रकांत कणबरकर,यशोधन किल्लेकर, जोतिबा किलेकर, राजू भातकांडेसह बहुसंख्य शेतकरी भाविक उपस्थित होते.