Kannada NewsKarnataka NewsLatest

एक कोटी 25 लाख रुपयाच्या अनुदानातून उद्यान विकास कामांचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते शुभारंभ

प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी: बेळगाव शहर अभिवृद्धि प्राधिकरणाच्या वतीने सुमारे एक कोटी 25 लाख रुपयांच्या अनुदानातून ग्रामीण विधानसभा क्षेत्राच्या उद्यान विकास कामकाजाचे ग्रामीण क्षेत्राचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उद्घाघाटन केले.
ग्रामीण भागातल्या जनतेने कित्येक वर्षापासून उद्यानांच्या विकासाची मागणी केली होती आता टप्प्याटप्प्याने त्यांची मागणी पूर्ण केली जात असून या क्षेत्राच्या संपूर्ण विकासासाठी मी सदैव तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आज समर्थ कॉलनी साई नंदन रेसिडेन्सी ड्रायव्हर्स कॉलनी लिंगराज कॉलनी याठिकाणी उद्यान निर्मिती तसेच कंपाउंड वॉल निर्मिती चे उद्घाघाटन आमदारांच्या हस्ते झाले.
सह्याद्री नगर येथील उद्यानात सुमारे 25 लाख रुपयांच्या अनुदानातून आंबेडकर भवनाची निर्मिती केली जाणार आहे.
आमदारांच्या विकास कामांबद्दल सर्व स्थानिक रहिवाशांनी कौतुक केले. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button