Kannada NewsKarnataka News

त्याग, साधेपणा व निस्वार्थी चिंतन नेतृत्वाचे प्रमुख गुण : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर

प्रगतिवाहिनी न्युज / घटप्रभा – 
त्याग, साधेपणा व निस्वार्थ चिंतन नेत्याचे प्रमुख गुण असल्याचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
घटप्रभा सेवादल प्रशिक्षण शिबिरात आयोजित तीन दिवशीय एनएसएसयुआय पदाधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण शिबिराच्या चिंतन मंथन या कार्यक्रमात सोमवारी संध्याकाळी त्या बोलत होत्या.
नेत्याचे गुण व महिला सबलीकरणविषयी त्या बोलल्या. उत्कृष्ट नेता होण्याचे सर्वांची इच्छा असते. पण यशस्वी नेता होण्यास कांही विशेष गुण असावी लागतात. नेत्याचे मुख्य लक्षण गुण त्याग व साधेपणा व स्वहिताचा विचार न करता सर्वांचे हित राखण्याचे योग्य चिंतन असल्याचे सांगितले.
आपल्या सभोवताली असलेल्या नागरिकांची मते संग्रहित करून, आदर करणे खरे नेतृत्व गुण आहेत. राजकारणात आपण ध्येय समोर ठेवून पुढे जावावे. राजकारण टाईमपास जॉब नव्हे तर फुल्ल टाईम जॉब असून राजकारणाला त्याचेच वेगळे महत्व असल्याचे हेब्बाळकर यांनी सांगितले.
यावेळी केपीसीसी कार्याध्यक्ष व राज्य विद्यार्थी काँग्रेस प्रभारी आर दृवणारायन, विधान परिषद सदस्य बी के हरिप्रसाद, केपीसीसी माध्यम विभागाचे अध्यक्ष बी एल शंकर, राज्य एनएसयुआयचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button