Kannada NewsKarnataka News

बेळगावीमध्ये काँग्रेसच्या बलवर्धनासाठी, बेंगलोरमध्ये बैठक

केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि विधानसभा विरोधी पक्षनायक सिद्धरामय्या यांची प्रमुख उपस्थिती

प्रगतीवाहिनी वार्ता;   बेंगळूरू;  बेळगावी जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे बलवर्धन करण्याविषयी, रविवारी बेंगळुरूमध्ये   महत्वाची बैठक घेण्यात आली.
केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विधानसभा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या,  विधानपरिषद विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील  यांनी बेळगावी ग्रामीण, बेळगावी नगर, तसेच चिकोडीच्या काँग्रेस नेत्यांच्याबरोबर; बेळगावीतील सध्याची राजकीय परिस्थिती, पक्षसंघटनेचे बलवर्धन, आणि येत्या निवडणुकीच्या संदर्भात, रविवारी समालोचन बैठकीचे आयोजन  करून विचारविनिमय केला.
केपीसीसी कार्याध्यक्ष ईश्वर खांडरे, सलीम अहमद, सतीश जारकीहोळी, विधानसभापक्ष मुख्यसचेतक डॉक्टर अजय सिंग, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, पी. एम. अशोक, गणेश हुक्केरी अंजली निंबाळकर, डी सी सी अध्यक्ष असिफ नुरुद्दीन शेख, विनय नावलगट्टी, लक्ष्मणराव चिंगळे आणि इतर उपस्थित होते.

Home add -Advt

बेळगावी पालिका, अपक्ष उमेदवार अधिक, समितीच्या रणनीतीचे काय होणार?

Related Articles

Back to top button