Kannada NewsKarnataka NewsLatest

कामगार आणि साखर मंत्री शिवराम हेब्बार यांची बेळगावला भेट

प्रगती वाहिनी न्यूज ,बेळगावी: कामगार आणि साखर मंत्री शिवराम हेब्बार यांनी आज बेळगावी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली.
यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांचा अहवाल स्वीकारून पक्ष संघटनेसाठी स्थानिक नेते तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश अंगडी, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संजय पाटील, नगराध्यक्ष शशिकांत पाटील आणि इतर कार्यकर्ते यावेळी हजर होते. यानंतर शिवराम हे यांनी ए एस आय इस्पितळाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली इस्पितळाच्या विकासासाठी तसेच मूलभूत सुविधांसाठी इस्पितळाच्या वैद्य अधिकाऱ्यांची चर्चा केली.
यानंतर बेळगाव जिल्हा शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी विविध धार्मिक संघटनांनी मंत्र्यांचा सत्कार केला. सत्कार समारंभानंतर बेळगावी जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखाना अधिकारी तसेच कार्मिक व साखर विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.
यावेळी रेल्वेमंत्री सुरेश सांगली साखर व कार्मिक खात्याचे इतर अधिकारी व शेतकरी उपस्थित होते

Home add -Advt

Related Articles

Back to top button