संकटाला धावून जाऊन रुग्णांचे अश्रू पुसण्याचे काम आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले
लक्ष्मी हेब्बाळकर केवल आमदार नसून, त्या आपल्या वाट्याला देवासारखे आल्याचे पूरग्रस्तांचे मत
प्रगतीवाहिनी न्यूज / बेळगावी –
रोग सांगून विचारून येत नाही, पण रोग माणसाला शारीरिक व मानसिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या कमजोर बनवतो. गरीब लोक लहान रोगाने त्रस्त होतात. आशावेळी कुणीतरी मदतीला धावून आले तर जणू देवाप्रमाणे दिसतात.
बेळगावी ग्रामीण मतदारसंघातील चार पाच जणांच्या वाट्याला आशा संकटकाळी देवाप्रमाणे येऊन आर्थिक मदत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पुरवली आहे.
लक्ष्मी हेब्बाळकर आमदार झाल्यानंतर घरची मुलगी बनून मतदारसंघातील हजारो लोकांना संकटांच्या काळी मदत करून त्यांच्या वाट्याच्या देवता बनल्या आहेत. कांहीना मुख्यमंत्री परिहार निधीतून मदत दिली आहे. कांहीना स्वत: पैसे देऊन अश्रू पुसण्याचे काम केले आहेत. विरोधकांच्या आरोप, आडकाठी होत असताना दुसरीकडे मात्र हेब्बाळकर यांची विकासकामे व लोकांशी संपर्क मात्र थांबवला नाही.
आता पुन्हा चार पाच मोठ्या रोगाने इस्पितळाचे खर्च भरता येत नसल्याच्या संकटात असल्याचे पाहून लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मुख्यमंत्री परिहार निधीतून आर्थिक मदत मिळवून दिले आहेत.
गणेशपूरचे के सन्मुगम मणी पीटर, सुळेभावीचे कौसर आयुब अतार , आंबेवाडीचे राजेंद्र विष्णू पाटील यांनी विविध रोगाने त्रस्त होते. मोठया प्रमाणात बिल आल्याने त्रस्त होते.
आता आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मुख्यमंत्र्यांची स्वतः भेट घेऊन रुगणांची होणारी फरफट व परिस्थिती सांगून मुख्यमंत्री परिहार निधीतून पैसे मंजूर करून देण्यात यशस्वी झाल्या आहेत. या चार जणांना 50 हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मंजूर झाली आहे. यामुळे रुग्णांनी निश्वास सोडला आहे.
आर्थिक मदत मिळवलेले , लक्ष्मी हेब्बाळकर केवल आमदार नसून, ते आमच्या वाट्याच्या देवासारख्या आल्याचे असे मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करीत आहेत.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ