प्रगतीवाहिनी वार्ता; बेळगावी; निपाणीच्या जवाहर तलावाच्या परिसरात उद्यान निर्मिती आणि सुशोभीकरण कार्याला प्रारंभ केला आहे. देशाची संस्कृतीविवरण करणाऱ्या अनेक मूर्ती येथे पाहायला मिळणार आहेत.
महिला आणि बालकल्याण खात्याच्या पाच कोटी रुपयांच्या अनुदानातून बालभवन निर्मिती करण्यात येणार आहे. असे मुजराई, वक्फ आणि हज मंत्री, शशिकला जोल्ले यांनी सांगितले. 15 व्या वित्त आयोगाच्या 2020- 21 सालच्या अनुदानातून 30 लाख रुपये खर्चून उद्यान निर्मिती, आणि 14 लाख रुपये खर्चाने सुशोभीकरण करण्यात येणार आहे, मंगळवारी या कामाला चालना देऊन त्या बोलत होत्या. म्हैसूर राज्यातील विविध उद्यानांचा विकास करणाऱ्या बागायत खात्याची उपसंस्था नर्सरी मेन को-ऑपरेटिव्ह, या संस्थेला हे काम सोपविण्यात आले आहे.
लहान मुलांसह सर्वच नागरिकांसाठी, हा भाग म्हणजे आकर्षक पर्यटन स्थळ बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत. मुलांसाठी टॉय ट्रेन सुद्धा येथे चालवण्याची योजना आहे, असे मंत्री शशिकला जोल्ले यांनी सांगितले. याप्रसंगी बोलताना खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले की, या भागाच्या विकासासाठी अनेक योजना हाती घेण्यात येऊन पूर्ण करण्यात येतील. नगरसभा अध्यक्ष जयवंत भाटले म्हणाले की Covid-19 च्या दुसऱ्या लाटेच्या काळात जोल्ले दम्पतिने केलेल्या कार्याने जनतेचे मन जिंकले आहे. कोणतीही दुर्घटना न होता, ‘जोल्ले केअर सेंटर’ मधून हजारो रुग्ण बरे होऊन परत गेले आहेत. अलीकडेच आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरामध्ये सोळाशे पेक्षा जास्त जेष्ठ नागरिकांना लाभ मिळाला आहे.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ