Kannada NewsKarnataka News

बेळगाव सिव्हिल इस्पितळात हिंसाचार

प्रगती वाहिनी न्यूज बेळगावी: इस्पितळात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी ॲम्बुलन्स ला आग लावन्यात आल्याची व दगडफेक केल्याची घटना आज सिविल इस्पितळ भागात घडली आहे.
येथील जिल्हा इस्पितळात एकोणीस तारखेला एका व्यक्तीला दाखल करण्यात आले होते त्याच्यावर उपचार सुरू असताना आज सायंकाळी त्याचा मृत्यू झाला हे समजताच नातेवाईकांनी एकच इस्पितळ समोर गदारोळ निर्माण केला ॲम्बुलन्स ला आग लावून दगडफेक केली.
ॲम्बुलन्स लागलेल्या आगीत जवळील वाहनाही इजा झाल्याचे समजते.
जमावाने पोलिसांवरही दगडफेक केल्याचे समजते इस्पितळातील डॉक्टर तसेच तेथे काम करणाऱ्या कर्मचारी वर्गांवर ही हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे यामुळे शहरातील विविध भागातून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
परिस्थिती नियंत्रणात असून संबंधितावर कारवाई होण्याची मागणी होत आहे.

Home add -Advt

Related Articles

Back to top button