प्रगतीवाहिनी वार्ता; गोकाक; दोन महिन्यापूर्वी घटप्रभा नदीला आलेल्या पुरामध्ये बुडाल्यामुळे संपूर्णपणे खराब झालेल्या जत-जांबोटी राज्य महामार्गावरील लोळसूर पुलाची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर, आज पुलाचे उद्घाटन करून पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली. केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी आणि के एम एफ अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांच्या सूचनेप्रमाणे आज पुलाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचे स्वीय सहाय्यक नागप्पा शेखरगोळ, आरिफ पिरजादे, बसू दासन्नावर, निंगाप्पा कुरबेट, यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
पूल चालू करण्याची सतीश जारकीहोळी यांनी केली होती सूचना, काल (शुक्रवारी) पुलाला भेट देऊन स्वतः सतीश जारकीहोळी यांनी पुलाची पाहणी केली करून कामाची स्तुती केली होती. आजपासून (शनिवार)पूल वाहतुकीला खुला करण्याची सूचना त्यांनी उपस्थित स्थानिक अधिकाऱ्यांना केली होती.
संपर्क तुटल्यामुळे झाली होती प्रवाशाना समस्या.
पुरामध्ये नुकसान झाल्यामुळे रहदारी बंद होऊन प्रवाशांना मोठा त्रास होत होता. जत- जांबोटी राज्य महामार्गावरील हा पूल महाराष्ट्र, विजयपूर, अथणी या भागाला बेळगाव तसेच उत्तर कर्नाटकाच्या इतर भागांना जोडणारा महत्त्वाचा पूल आहे. हा पूल बंद झाल्यामुळे, प्रवाशांना लांबचा वेढा घालून जावे लागत होते, आणि परिणामी प्रवाशांचा वेळ आणि खर्च नाहकपणे वाया जात होता.
आमदार द्वयाच्या सतत प्रयत्नाने दुरुस्ती कार्याला मिळाला वेग.
आमदार सतीश जारकीहोळी आणि आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांना भेटून दुरुस्ती करून, पूल खुला करण्याचे आदेश दिले होते, त्यांच्या सततच्या प्रयत्नामुळेच आता पुन्हा पूल खुला झाला आहे.
आमदार सतीश जारकीहोळी आणि आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या कार्याचे, प्रवाशांनी आणि जनतेने कौतुक करून आभार मानले आहेत.
ग्रामीण मतदार क्षेत्रामध्ये 7.55 कोटी रुपये खर्चाच्या तीन योजनांची सुरुवात
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ