पंधरा दिवसात उसाचे बाकी बिल द्यावे-साखर आणि कामगार मंत्री यांची सूचना
जिल्ह्यात एकूण तेरा साखर कारखाने असून एकूण 96 टक्के बिल शेतकऱ्यांना दिले आहे शेतकऱ्यांचे बाकी राहिलेले बिल येत्या पंधरा दिवसात द्यावे अशी सूचना साखर आणि कामगार मंत्री शिवराम हेब्बार केली. जिल्हाधिकार्यालयात सोमवारी झालेल्या प्रगती आढावा बैठकीत ते बोलत होते.
साखर निर्देशनालय सुवर्ण विधानसभा येथे स्थलांतरित करावे यासाठी मागणी होत आहे पण एकच निर्देशनालय बेळगावी साठी स्थलांतरित करण्यास येत नसून या विषयावर नंतर बोलू असे त्यांनी सांगितले.ज्वारी पीक नुकसानीसाठी पाच हजार रुपये नुकसान भरपाई देत असून या योजनेमुळे 40 लाख शेतकऱ्यांना मदत होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
सरकारला माहिती न देताच कारखाने बंद करू नये:
100 हून अधिक कामगार असणाऱ्या कारखान्यांनी सरकारच्या परवानगीशिवाय कोणतेही कारखाने बंद करू नयेत यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे असे सूचित केले.सरकारने आतापर्यंत कामगारांना 5000 परिहार निधी जाहीर केला असून येत्या वीस दिवसात कामगारांना निधी मिळावा यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत .
राज्यात एकूण 20 लाख 30 हजार कामगार असून येत्या दहा दिवसात या सर्वांना परिहार धन येण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. Covid-19 मुळे धोबी आणि क्शौर धंद्याला फटका बसला असून त्यांनाही पाच हजाराची मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अशा कामगारांना कोणतेही कागदपत्राची आवश्यकता नसून PDO यांच्या नेतृत्वात प्रत्यक्ष येथे भेट देऊन पर्यानिधी मंजूर करून द्यावा असे डॉक्टर राजेंद्र केवी यांना सूचना केली.
यावेळी आमदार अभय पाटील रेल्वेमंत्री सुरेश अंगडी खासदार अण्णासाहेब जोल्ले आमदार अनिल बेनके अप्पर जिल्हाधिकारी अशोक दु. तसेच इतर अधिकारी उपस्थित होते
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ