Kannada NewsKarnataka NewsLatest

सुरेश अंगडी आणि अनिल बेनके नी केली दहावी परीक्षा केंद्राची पाहणी

प्रगती वाहिनी न्यूज ,बेळगावी: गुरुवार पासून होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश अंगडी तसेच बेळगावी उत्तरचे क्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी गुरुवारी परीक्षा केंद्रांना भेट दिली.
मंत्री सुरेश अंगडी आणि डी डी पी आय पुंडलिक यांनी सरदार हायस्कूलला भेट देऊन तेथील परीक्षा केंद्राची पाहणी केली. कोरोना होऊ नये यासाठी घेण्यात आलेल्या सर्व सुविधांची त्यांनी माहिती घेतली.
याबरोबरच उत्तर क्षेत्रातील दहावीच्या परीक्षा केंद्रांना आमदार अनिल बेनके यांनी भेट दिली,माळ मारुती कॉलनीतील जीवन ज्योती शाळेत covid-19 सुरक्षेविषयी आमदारांनी सबंधित अधिकार्‍यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही परीक्षा केंद्रात सोशल डिस्टंसिंग व कोरोना होऊ नये याची काळजी घेतल्याचा विश्वास व्हावा अशी जागृतता करावी असे अधिकाऱ्यांना सूचित केले.
विद्यार्थ्यांना परीक्षेला येताना प्रत्येकाने मास्क घातलेले असावे तसेच त्यांनी टायझर वापरावे. व प्रत्येक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीही केली जावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
शिक्षण खात्याचे अधिकारी, पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ

Related Articles

Back to top button