Karnataka NewsLatest
जम्मू काश्मीर तीन आतंकवादी ठार

प्रगती वाहिनी न्यूज, श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सेनेने तिघा आतंकवाद्यांचा खातमा केला आहे. खादी बोल सौरा प्रदेशात लपून बसलेल्या आतंकवाद्यांना आपल्या भारतीय सेनेने कंठस्थानी पाठवली आहे.
येथील एका घरात लपून बसलेल्या आतंकवाद्यांना शरणागती पत्करावी असे सांगितले तरीही आतंकवाद्यांनी गोळीबार केल्यामुळे आपल्या शूर सैनिकांनी त्यांचा खात्मा केला. 2019 पासून हे तिघे जण आतंकवादी संघटनेमध्ये सक्रिय झाले होते तर यामधील एकाने मागच्या महिन्यात झालेल्या बीएसएफ जवानाच्या हल्ल्यात सहभाग घेतला होता. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार हे कार्य करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.




