उद्यापासून रात्री आठ ते सकाळी पाच पर्यंत पुन्हा कर्फ्यू तर सरकारी नोकरदारांना आता फक्त पाच दिवस काम
प्रगती वाहिनी न्यूज, बेंगलोरु: दहावीच्या परीक्षेनंतर राज्यात पुन्हा एकदा कोरोना च्या नियंत्रणासाठी कडक नियम लागू होण्याची शक्यता आहे.
जुलै चार तारखेला दहावीच्या परीक्षा संपत असून जुलै 5 नंतर कोरोनाच्या नियंत्रणाबाबत ठोस निर्णय घेतले जातील असे मंत्री आर अशोक यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना आर अशोक यांनी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात झालेल्या निर्णयांबाबत माहिती दिली. दहावीच्या परीक्षा संपताच कोरोनाच्या नियंत्रणासाठी कठीण निर्णय घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जुलै 5 नंतर रविवारी कम्प्लीट लोक डाऊन असणार आहे. कोणतीही ऑटो टॅक्सी किंवा बस सुविधा असणार नाही सेच सरकारी कर्मचार्यांनाही आठवड्यातील पाच दिवस काम करावे लागणार आहे. उद्यापासून रात्री आठ ते सकाळी पाच पर्यंत राज्यभर कर्फ्यू लागू होईल असे ते म्हणाले.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ