येडुर वीरभद्र देवस्थान आणि काडसिद्देश्र्वर संस्थान मठ यांच्या तर्फे सुसज्जित इस्पितळ
प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी:कर्नाटक महाराष्ट्र राज्य सह इतर राज्यातील विर भद्रा च्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व येडुर नागरिकांच्या आरोग्याच्या सेवेसाठी येडूर विरभद्र देवस्थान व काड सिद्धेश्वर संस्थान मठातर्फे येडुर येथे सुसज्जित रुग्णालय उभारण्याचा संकल्प असल्याचे प्रतिपादन श्रीशैल पिठाचे जगद्गुरु डॉक्टर चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले
जुने येडुरयेथे सर्व समाजाच्या नागरिकासाठी शासनातर्फे सुमारे 24 लाख रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या रुद्रभूमीच्या कामाचा शुभारंभ प्रसंगी श्रीशैल पिठाचे जगद्गुरु स्वामीजी बोलत होते या समारंभाच्या अध्यक्षस्थानी चिक्कोडी चे खासदार अण्णासाहेब जोले प्रमुख पाहुणे म्हणून बसवज्योती युथफाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोले शिवतेज फाउंडेशनचे अध्यक्ष अजय सूर्यवंशी येडुर ग्रामपंचायत माजी अध्यक्ष अमोल बोरगावे चंदूर प्राथमिक कृषी सहकारी संघाचे माजी अध्यक्ष मनोज खिचडे चंद्रकांत कमते अण्णाप्पा बोरगावे इरगोंडा पाटील दिपक इनामदार हे उपस्थित होते
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत दिनेश हेदुरे यांनी केले रुद्र भूमी च्या कामाचा शुभारंभ खासदार अण्णासाहेब जोल्ले व बसव प्रसाद जोले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अण्णासाहेब जोल्ले बोलताना म्हणाले की चिकोडी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक खेळाच्या विकासासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न असून सर्वसामान्य जनतेने सामाजिक कार्याचा पुढाकार घेऊन आर्थिक प्रगती बरोबरच समाजकार्य करावे असे त्यांनी सांगितले पुढील काळात गावच्या विकासासाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले
शिवतेज फाउंडेशनचे अध्यक्ष अजय सूर्यवंशी बोलताना म्हणाले की जुने येडूर येथील रुद्रभूमीच्या मंजुरीसाठी पाच वर्षांचा कालावधी लोटला सदर रुद्र भूमि च्या कामासाठी विशेष प्रयत्न केलेल्या राजू दडे व पोपट बोरगावे यांचे विशेष आभार मानले तसेच रुद्र भूमि साठी जमिनी दिलेल्या आप्पासाहेब सुतार या दांपत्याचा सत्कारही करण्यात आला पुढील काळात जनतेला योग्य उपचार मिळावा यासाठी खासदार निधीतून येडुर गावासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सूर्यवंशी यांनी केली
या कार्यक्रमास श्रीकांत बोरगावे प्रकाश कोकणे श्रीकांत बेडगे मुकुंद जाधव विनायक गुरव विनायक जाधव राजू हाकारे डॉक्टर सुकुमार चोगला रमेश वाळके इरगोंडा अमगी सुरेश मोहिते सुनील पवार संजय गायकवाड शेखर करोशि यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते
फोटो जुने येडर येथील सर्व समाजासाठी शासनातर्फे मंजूर करण्यात आलेल्या रुद्र भूमीच्या कामाचा शुभारंभ करताना खासदार अण्णासाहेब जोले शेजारी श्रीशैल पिठाचे जगद्गुरु अजय सूर्यवंशी अमर बोरगावे बसव प्रसाद जोले व इतर मान्यवर
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ