Kannada NewsKarnataka News

 डी टी देसाई यांचे निधन 

प्रगती वाहिनी न्यूज बेळगावी:   जैन समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ,उद्योजक आणि भरतेश शिक्षण संस्थेचे  विध्यमान संचालक श्री धन्यकुमार  उर्फ डी टी देसाई  यांचे शुक्रवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.ते 73 वर्षाचे होते.
प्रख्यात सिमेंट व लोखंड व्यापारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. मिलेनियम गार्डनचे ते भागीदार होते अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी ते निगडीत होते. भरतेश शिक्षण संस्थेचे  ते जुने संचालक असून  सचिव म्हणूनही त्यांनी काही वर्षे काम केले आहे
काही वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या निवासस्थानी डी टी देसाई पब्लिक स्कूलची सुरुवात केली असून ते उत्तम व प्रगतशील शेतकरी होते . रोज नियमितपणे ते शेतावर जायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा देवेंद्र आणि तीन  विवाहित कन्या असून त्या तिघीही दंतचिकित्सक आहेत. डॉक्टर सतीश बागेवाडी हे त्यांचे जावई होत

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ

Related Articles

Back to top button