
 बेळगावी : मंगळूरु आंतरराष्ट्रीय विमानतळाला पिछाडीवर टाकत बेळगावी विमानतळ राज्यात दुसरे सर्वाधिक प्रवासी असणारे विमानतळ म्हणून नावरूपास आले आहे.
   मागील जून महिन्यात बेळगावी विमानतळावरून  एकूण 391 विमानानी उडान घेतली होती. तर 10, 224 लोकांनी प्रवास केले आहेत.
   भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जून महिन्यात डेटा रिलीज केला असून त्यात बेळगावी विमानतळानेे दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
  बेंगळुरूनंतर बेळगावीचा क्रमांक लागला आहे.  मंगळूरु आंतरराष्ट्रीय विमानतळातील प्रवाशांची संख्या मागे पाडून आता  दुसरा क्रमांक मिळविला आहे.
  मंगळूर तिसरा क्रमांक तर कलबुर्गी चौथा क्रमांक व म्हैसूर पाचवा क्रमांक मिळविला आहे. हुबळीतून 14 विमानांनी उडान केले आहे तर केवळ 55 जणांनी प्रवास केला आहे. म्हैसूरहून 330 विमाने उडान केली असून 3158 प्रवाशांनी प्रवास केला आहे.
				
				
					
					
				
					
					
					
					
					
