प्रगती वाहिनी न्यूज,सिरसी: गेल्या साडेसहा दशकांपासून ग्रामीण भागात माध्यमिक तसेच पदवीपूर्व शिक्षण देणाऱ्या यडहळी माध्यमिक शिक्षण प्रसार समितीने करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना यावर्षीच्या शिक्षणामध्ये संपूर्ण सूट दिली आहे.
याबद्दल समितीचे अध्यक्ष श्रीधर हेगडे म्हशीगड्डे यांनी आठवी, नववी आणि दहावी या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण शिक्षण दिले जाणार असल्याचे सांगितले. त्याबरोबरच मुलींच्यासाठी मोफत हॉस्टेलची सुविधाही करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
इलेक्ट्रॉनिक एज्युकेशन सुविधा, ग्रंथालय ,मोठे क्रीडांगण अश्या सर्व सुविधांनी भरलेले आमच्या संस्थेत करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग ठेवूनच शिक्षण दिले जाणार आहे. आतापर्यंत 10,000 हून अधिक विद्यार्थी आमच्या संस्थेच्या शाळांमध्ये शिक्षण घेतले असून बागलकोट जिल्ह्यातूनही विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत. गुणवत्ता आणि चांगला शिक्षणाचा अनुभव असणार्या शिक्षकांच्या आधारावर ही संस्था एवढी मोठी झाली आहे.
बाहेर राज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बसची सुविधा तसेच पाठ्यपुस्तकाचीही सुविधा येथे केली जाणार आहे.
इच्छुकांनी मुख्याध्यापक विद्योदय माध्यमिक शाळा हळी सिरसी मुख्याध्यापक केजी भट यांना भेटावे असे सांगितले आहे.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ