प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी: रोटरी क्लब ऑफ बेलगाम नॉर्थचा एकोणीसावा वाढदिवस आज बेळगावातील शिव बसव ज्योती मेडिकल कॉलेजच्या सभागृहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डी जी आर डॉक्टर रवी हुंजे उपस्थित होते.
समाज कार्य जर मोठ्या प्रमाणावर करावयाचे असल्यास रोटरी सारख्या मोठ्या संस्थांमध्ये भाग घ्यावा असे आवाहन रवी हुंजे यांनी केले. पोलिओचे संपूर्ण निर्मूलीनिकरण रोटरी मुळेच झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. इन्फोसिस, मिलींदा फाउंडेशन, अशा मोठमोठ्या संस्था रोटरीच्या होणाऱ्या कामामुळे भरभरून मदत करत असल्याचे ते यावेळी म्हणाले. रोटरी मध्ये महिलांनीही ही सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
Covid-19 सारख्या परिस्थितीत रोटरी क्लब ऑफ बेलगाव नॉर्थ चांगले काम केल्याची प्रशंसा त्यांनी यावेळी केली.
विविध कामांमध्ये पुढाकार घेऊन सहकार्य केलेल्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अध्यक्ष सुरेश यांनी रोटरीसाठी दान केलेल्या सदस्यांचे आभार मानले
रोटेरियन नम्रता सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.वर्षभर झालेल्या रोटरी कामकाजाचा सेक्रेटरी जी एस पाटील यांनी आढावा घेतला.
AG महेश अनगोळकर,AGE अजय हेडा, शशिकांत सूर्यवंशी, इरफान शेखाली, अभय सिंग ठाकूर, दुर्गेश हरिते, पुष्पा एम, डॉक्टर डी टी बामणे,dr पूजा बामणे, संगीता ठाकूर, प्रकाश पाटील, सुनिता पाटील, रवी पाटील, उदयकुमार हवालदार, दुंडाप्पा मुचंडी, डॉक्टर कुणाल वठारे व इतर रोटेरियन सदस्य उपस्थित होते.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ