जुलै दोन रोजी कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष म्हणून डीके शिवकुमार अधिकार स्वीकारतील
प्रगती वाहिनी न्यूज बेळगावी: जुलै दोन तारखेला कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष म्हणून डीके शिवकुमार अधिकार स्विकारणार आहेत हा कार्यक्रम देशाच्या इतिहासातच एक नवा अध्याय घडवेल असे केपीसीसी महिला घटकाच्या माजी राज्याध्यक्ष आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
जिल्हा काँग्रेस कार्यालयात पत्रकारांशी बोलताना कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून राज्यभरात 7800 ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर या अधिकार ग्रहण समारंभाचे लाईव्ह टेलिकास्ट केले जाईल यामध्ये दहा हजाराहून अधिक लोक सहभागी होण्याची शक्यता आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रगीतानंतर प्रतिज्ञा घेऊन ते अधिकार स्वीकारतील असे त्या वेळी म्हणाल्या.
बेळगाव जिल्ह्यातही सुमारे 550 ठिकाणी कार्यक्रमा पाण्याची व्यवस्था केली असून 7676366666 या नंबरला मिस कॉल देऊन कार्यक्रमाला पाठिंबा द्या अशी विनंती त्यांनी यावेळी केले. आम्ही डिजिटल चा वापर करून कार्यक्रम अगदी विशिष्ट पद्धतीने आयोजित करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नवीन जिल्हा काँग्रेस कार्यालयात पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतलेला लक्ष्मी हेब्बाळकर यांनी हे कार्यालय काँग्रेस पक्षाचे मंदिर असल्याचे त्यांनी सांगितले.
मी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष असताना ही जागा मिळण्यासाठी भरपूर प्रयत्न केले होते व या कार्यालयाच्या बांधकामाची सुरुवात झाली होती.
डीके शिवकुमार यांच्यासोबत सतीश जारकीहोळी ईश्वर खंडारे सलीम अहमद दप हेही कार्याध्यक्ष म्हणून अधिकार स्वीकारला असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
बेळगाव जिल्ह्याचे सर्व काँग्रेस पक्षाचे नेते एकत्र असून आमच्यामध्ये कोणतेही भेदभाव नाहीत सतीश जारकीहोळी हे सुद्धा आमचे नेते आहेत. कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी आम्ही वेगळ्या पत्रकार परिषद घेत आहोत यावेळी माजी आमदार फिरोज सेट ,जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी, राजू शेठ आदी उपस्थित होते
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ