प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी: रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ यांच्यावतीने आज 100 झाडे लावण्यात आली. रोटरी च्या नव वर्षाला जुलैपासून सुरुवात झाली असून त्यांचा हा पहिलाच उपक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. वनविभागाच्या सहकार्यातून ही झाडे लावण्यात आली.
वनविभागाचे अधिकारी विनय गौडर यांनी यासाठी मदत केली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून असिस्टंट गव्हर्नर अजय हेडा हे उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ या उपक्रमाबद्दल त्यांनी प्रशांसा व्यक्त केली. रोटरीने यावर्षी प्रत्येक रोटरी नंबरने एक तरी झाड लावावे असे आव्हान केले असून याचा पहिलाच भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले. वाढत्या सिमेंट कारणामुळे जंगले नष्ट होत असून वातावरणात चढ-उतार होत आहे पाऊस वेळेवर पडत नाही यासाठी झाडे लावणे अत्यावश्यक आहे असे ते म्हणाले.
बॉक्साईट रोडवरील आधार एज्युकेशनच्या प्रांगणात ही झाडे लावण्यात आली, यामध्ये चाफा फणस जांभूळ अशा अनेक प्रकारची झाडे यावेळी लावली गेली, यासाठी रोटेरियन डॉक्टर डी टी बामणे यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमात अध्यक्ष इरफान शेखाली तसेच सेक्रेटरी शशिकांत सूर्यवंशी, प्रकाश पाटील, अभय सिंग ठाकूर , नम्रता सूर्यवंशी ,उमेश गोरेबाल ,चैत्रा गोरेबाल, संगीता ठाकूर, उदयकुमार हवालदार, डॉक्टर कुणाल , पुष्पा एम, Dr पूजा बामणे, रश्मी धनवंत, जी एस पाटील, S सुरेश, CA आनंद नायक, श्रेयस नाकाडी, नबीला शेखाली, वनखात्याचे अधिकारी निम्बर्गी व इतर रोटरी क्लबचे सदस्य यावेळेला उपस्थित होते.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ