Kannada NewsKarnataka News

चिकोडीत कोव्हीड इस्पितळ सुरू करण्याची गणेश हुकेरींची सूचना

चिकोडीतील मिनी विधानसौध येथे बुधवारी पार पडलेल्या तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांच्या विशेष बैठकीत ते बोलत होते. दिवसेंदिवस कोरोना प्रकरणात वाढ होत आहे. येथील रुग्णांना बेळगाव येथे उपचार घेताना अनेक अडचणींना सामोरे जावावे लागते. यामुळे चिकोडी शहर परिसरात स्वतंत्र असे कोव्हीड इस्पितळ सुरू करण्याची गरज आहे.

यामुळे यापूर्वी सुरू केलेल्या कोव्हीड केअर सेंटरच्या धर्तीवर कोव्हीड इस्पितळ सुरू करावे. त्यासाठी आवश्यक सर्व तयारी करण्याची सूचना दिली.
अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करावे. एकीकडे महापुराची भीती सतावत आहे. त्यामुळे दोन्हींचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज राहावे असे सांगितले.
कोणत्याही उपकरणे, साहित्य व सुविधांची कमतरता असल्यास सांगावे. सरकारच्या पातळीवर प्रस्ताव पाठविण्यात येईल. या विषयी हलगर्जीपणा खपवला जाणार नसल्याचे सांगितले.
यावेळी चिकोडी प्रांताधिकारी रवींद्र करलिंगनवर, तहसीलदार सुभाष संपगावी, चिकोडी आय एम ए अध्यक्षा डॉ रोहिणी कुलकर्णी, डॉ प्रगती पाटील, डॉ मगदूम, ता पं कार्यकारी अधिकारी समीर मुल्ला, मुख्याधिकारी सुंदर रुगी आदि उपस्थित होते.

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ

Related Articles

Back to top button