प्रगतीवाहिनी न्युज / चिकोडी – महाराष्ट्र राज्यासह सीमाभागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे तालुक्यातील 4 पूल वजा बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. तालुक्यातील दूधगंगा नदीवरील मलीकवाड दत्तवाड, सदलगा बोरगाव, कृष्णा नदीवरील कल्लोळ येडूर बंधारा, बुवाची सौन्दती पूल पाण्याखाली गेला आहे.
यामार्गावरील रस्ते बेरिकेड्स लावून बंद करण्यात आले असून याठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
आज दिवसभरात मोठ्या प्रमाणात नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याने नदी काठावरील नगरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मागील ऑगस्ट महिन्यात महापुरात घरदार गमावले असताना पुन्हा एकदा ऑगस्ट महिन्यात महापुराच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
चिकोडी तालुक्यात मुसळधार पाऊस : मंगळवार दिवस, रात्रीपासून बुधवार देखील पावसाने चिकोडी तालुक्याला जोरदार झोडपून काढले. तालुक्यातील सर्वच गावामध्ये पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. नदी, नाले, शेती शिवार भरून वाहत आहेत. यामुळे अनेक रस्त्यावर पाणी आल्याने छोटे मोठे रस्ते वाहतुकीस बंद झाले आहेत. तर अनेक घरे, झाडे कोसळण्याची घटना घडल्या आहेत.
आज चिकोडी प्रांताधिकारी रवींद्र करलिंगनवर, तहसीलदार सुभाष संपगावी, ता पं कार्यकारी अधिकारी समीर मुल्ला यांनी येडूरवाडीसह नदी काठावरील गावांना भेट देऊन पाहणी केले.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ