Kannada NewsKarnataka NewsLatest

लक्ष्मीताई सौहार्द सोसायटी अस्तित्वात , संचालक मंडळाची निवड

 प्रगतीवहिनी न्युज,  बेळगावी–  पाच जिल्ह्यांची व्याप्ती  असलेल्या लक्ष्मीताई सौहार्द सहकारी नियमित, बेळगावी संस्था स्थापना करण्यात येणार आहे.
    सौदती येथे मुख्य प्रशासकीय कार्यालय  कार्यरत असणार असून संस्थेचे कार्यक्षेत्र बेळगावी, बागलकोट, विजापूर, गदग व धारवाड आदी जिल्ह्यात असणार आहे.
   संचालक मंडळाची पहिली बैठक गुरुवारी पार पडली. या सभेत संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी चन्नराज बी हट्टीहोळी व उपाध्यक्षपदी महांतेश वी. मतिकोप्प यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांची सर्वानुमते संस्थेच्या गौरवाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
   लवकरच सौन्दती शहरात प्रशासकीय कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. हर्षा साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांना सोयीचे होण्यासोबत नागरिकांना देखील सोयीचे व्हावे यासाठी संस्था सुरू केली आहे. याचा सदुपयोग नागरिकांनी घ्यावे असे संस्थेचे नूतन अध्यक्ष चन्नराज हट्टीहोळी यांनी विनंती केले.

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ

Related Articles

Back to top button