बेळगावी ग्रामीण मतदारसंघात विविध विकासकामांचा आमदार लक्ष्मी हेब्बाळकरांकडून शुभारंभ
रविवारी अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या लक्ष्मी हेब्बाळकर , चनराज हट्टीहोळी
प्रगतीवाहीनी न्युज / बेळगावी –
बेळगावी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात रविवारी विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. एक आठवडाभर बेंगळुरात विधानसभा अधिवेशनात उपस्थित राहून परतलेल्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, संपूर्ण दिवस मतदारसंघाचा दौरा करून अनेक विकासकामांची पूजा करून शुभारंभ केल्या.
बेळगावी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात वर्षातील 365 दिवस विकास योजना सातत्याने राबविल्या जात आहेत. कोणत्याही कारणामुळे विकासाला अडथळा येत नाही. तसेच मी देखील 365 दिवस, दिवसातील 24 तास लोकांच्यात राहते. मतदारसंघाचा विकास, नागरीकांची विचारपूस सोडल्यास मला दुसरे काम नसल्याचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
ग्रामीण मतदारसंघातील लोक सदैव आपल्यासोबत असल्याने मी आमदार म्हणून यशस्वीपणे कार्य करणे शक्य झाले आहे. तसेच मतदारसंघातील लोकांची अडचन, कष्ट असो किंवा सुख असो आपले संपूर्ण कुटुंब सोबत असते. नैसर्गिक विकोप, सांसर्गिक रोगांची साथ आलेली असताना लोकांनी डोळ्यांनी पाहिले आहे. ग्रामीण मतदारसंघातील लोकांसोबत आपले चांगले संबंध आहेत. हे नाते असेच पुढे वृद्धिंगत होईल असे हेब्बाळकर यांनी सांगितले.
कीणये गावातील सरस्वती गल्लीत काँक्रीट रस्त्याच्या कामाचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पूजा केली. मतदारसंघात सातत्याने विकासकामे केल्यामुळे ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी आमदारांचा सत्कार केले. यावेळी गावातील पंच, ग्राम पंचायत अध्यक्ष स्नेहल सुतार, उपाध्यक्ष मलाप्पा पाटील, सर्व सदस्य, पंचायत विकास अधिकारी कुडची, मारुती डुकरे, वर्षा डुकरे, विनायक पाटील, संजू हणबर, भर्मनी पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यानंतर किनये गावातील पशु इस्पितळास भेट देऊन लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तेथील तक्रारी, समस्या जाणून घेतल्या. पशु इस्पितळाची इमारत लहान असून, ती मोठी करण्याविषयी गावातील लोक व पशु वैद्याधिकारी कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली.
कंग्राळी बी के गावातील तलाव सौन्दर्यीकरनाची विविध विकासकामे प्रगतीपथावर असून, लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पाहणी करून माहिती घेतली. तसेच गणेश विसर्जनासाठी गैरसोय होत असल्याचे सांगितल्याने यापूर्वी स्वतंत्र तलावाची निर्मिती केली जात आहे. तलावाच्या कामाबदल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. लवकरात लवकर सर्व कामे पूर्ण होणार असल्याचे हेब्बाळकर यांनी ग्वाही दिली. यावेळी गावातील पंच, ग्राम पंचायत उपाध्यक्ष अनिल पावशे, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष दता पाटील, जयराम पाटील, आडीवेप्पा हतरगी, सदेप्पा राजकट्टी, ग्राम पंचायत सदस्य अर्चना पाटील, सिद्दराई बेळगावी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मतदारसंघातील कंग्राळी के एच गावातील नूतन अंगणवाडी इमारत व सरकारी मराठी प्राथमिक शाळेच्या नूतन स्मार्ट क्लास इमारत निर्मितीच्या कामाची पूजा केल्या. याप्रसंगी गावातील पंच, बाळू पाटील, मनोहर पाटील, ग्राम पंचायत माजी अध्यक्ष लता पाटील, विशाल भोसले, ज्योतिबा पाटील, विनायक पाटील, शाळेचे कर्मचारी आदी उपस्थित होते.
डॉ.आंबेडकर भवन इमारतीचे कॉलम पूजा
हंगरगा गावात डॉ आंबेडकर भवन इमारत कॉलम पूजा रविवारी स्थानिक प्रतिनिधीनी केली. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या अनुपस्थितीत चनराज हट्टीहोळी उपस्थित मार्गदर्शन केले.
याप्रसंगी एससी एसटी ब्लॉक अध्यक्ष महेश किळकर, बाळू पाटील, बाळकृष्ण कांबळे, निवृत्ती तळवार, यलाप्पा पाटील व ग्राम पंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
बेळगावी ग्रामीण मतदारसंघात विविध विकासकामांचा शुभारंभ
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ